मोटेरावरील खेळपट्टीबाबत पुजारा अनभिज्ञ, म्हणाला...

By

Published : Feb 21, 2021, 10:40 AM IST

thumbnail
भारत-इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नई येथे खेळवण्यात आले. उभय संघातील तिसऱ्या 'पिंक बॉल' कसोटी सामन्याला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या मोटेरावर रंगेल. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा या सामन्यासाठी उत्सुक आहे. आत्तापर्यंत ८३ आंतरराष्ट्रीय कसोटी खेळलेल्या पुजाराने मोटेरावरील खेळपट्टीबाबत भविष्यवाणी करण्याबाबत नकार दिला आहे. ''मी अनेक कसोटी सामने खेळलो आहे. मात्र, मोटेरावरील खेळपट्टी नवीन आहे. त्यात माझा गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळण्याचा अनुभव कमी आहे. त्यामुळे भविष्यवाणी करणे चुकीचे ठरेल'', असे पुजारा म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.