मुंबई Amit Shah On Mother Tongue : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात रविवारी सायंकाळी हजेरी लावली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, "नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मातृभाषा सक्तीची करणार आहोत. आम्हाला माहीत आहे की, आमच्या या निर्णयाला प्रचंड विरोध होईल. मात्र तरीदेखील आम्ही हा निर्णय घेणार आहोत. बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं ही मागणी जेव्हा केली गेली, तेव्हा बॉम्बे नको तर मुंबईच नाव हवं, अशी मागणी करणारा मी देखील होतो," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तर कुटुंबातील संवाद संपून वृद्धाश्रम वाढतील : याप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले की, "आजच्या काळात प्रत्येकाला मातृभाषा येणं हे फार गरजेचं आहे. माझं तुम्हाला सांगणं आहे की, किमान तुमच्या घरामध्ये तरी तुम्ही मातृभाषेत बोला. जर का तुम्ही हे केलं नाही, तर पुढं मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धाश्रम काढण्याची वेळ आपल्यावर येईल. याचं कारण जर का, घरामध्ये नातू मातृभाषेत बोलला नाही, तर त्याचं त्याच्या आजोबांशी नातं जोडणार कसं? सध्याच्या धावपळीच्या जीवनात घरात आई-वडिलांकडं वेळ नसतो, तो फक्त आजी आजोबांकडं असतो. त्या कारणानं मातृभाषा येणं हे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणं प्रत्येक क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मागणी न करता फक्त काम करणारा समाज म्हणजे पारसी समाज आहे. या समाजानं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता समाजाची सेवा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ते टाटा असोत किंवा होमी भाभा त्यांचं समाजासाठी फार मोठं योगदान आहे, असंही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
अल्पसंख्यांक समाजामध्ये ही अल्पसंख्यांक समाज : अमित शाह पुढं म्हणाले की, "अल्पसंख्यांक समाजामध्ये सुद्धा अल्पसंख्यांक समाज आहे. जे लोक अल्पसंख्यांक समाजाच्या विषयासाठी नेहमी धडपडत असतात, त्यांना मला सांगायचं आहे की, अल्पसंख्यांक समाजामध्ये जो अल्पसंख्यांक समाज आहे, तो म्हणजे पारसी समाज आहे. या समाजाचं फार मोठं योगदान आहे. मुंबईतील दैनिकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून समजलं. कोणत्याही संस्थेला 200 वर्ष एक दैनिक चालवणं अवघड असतं. परंतु मागील दोनशे वर्ष हे दैनिक चालत आहे, याचा अभिमान आपल्याला आहे. नरेंद्र मोदी यांचं 2014 सालीचं स्वप्न छापणारा हा एकच पेपर आहे. 1957 ची क्रांती, मिठाचा सत्याग्रह, काँग्रेस स्थापना स्वतंत्र आंदोलन, आणीबाणी दरम्यान स्वातंत्र्यासाठी धडपडणारे लोक या सर्व गोष्टींचा रिपोर्ट या दैनिकानं केला असल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- अमित शाह 'लालबागचा राजा'ही गुजरातला घेऊन जातील, संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Attack On Amit Shah
- भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार? अमित शाह यांच्या वक्तव्यानं चित्र स्पष्ट - Amit Shah on Champions Trophy 2025
- गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन, राजकीय खलबतं रंगणार ? - Amit Shah Mumbai Visit