मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन - CM Eknath Shinde - CM EKNATH SHINDE
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-09-2024/640-480-22407552-thumbnail-16x9-cm.jpeg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Sep 8, 2024, 10:38 PM IST
आळंदी (पुणे) CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदीमध्ये आले होते. त्यांनी कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन (Sant Dnyaneshwar Maharaj) घेतलय. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान मारुती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या व रामाणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्यासह वारकरी सांप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
माऊलींच्या चरणी घातलं साकडं : यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर चांगला पाऊस झाला आहे. बळीराजाला सुखी आणि समाधानाचे दिवस येवोत असं साकडं माऊलींच्या चरणी शिंदे यांनी घातलं. तसेच राज्यात गणरायाचं आगमन झालं आहे. हे आगमन राज्यात भरभराटी आणि सुख-समृद्धी घेऊन येईल अशी प्रार्थना गणराया चरणी केल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं. तर अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याच्यापाठीमागे सरकार राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.