ETV Bharat / entertainment

युजर्सनी दीपिका आणि रणवीरच्या मुलीसाठी सूचवली 'ही' सुंदर नावं, जाणून घ्या याचा अर्थ - Unique Name Suggestions From Fans - UNIQUE NAME SUGGESTIONS FROM FANS

Deepika Ranveer Welcomes Baby Girl: दीपिका आणि रणवीरनं आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाला गोंडस बाळ झाल्यानंतर आता तिचे चाहते, बाळाला देण्यासाठी काही नावे सुचवत आहेत. आता ही नावे कुठली आहेत, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Deepika Ranveer Wecomes Baby Girl
पिका आणि रणवीरनं केलं एक बाळाचं स्वागत (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 11:04 AM IST

मुंबई Deepika Ranveer Welcomes Baby Girl : बॉलिवूडमधील सुंदर जोडप्यांपैकी एक असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी 8 सप्टेंबर रोजी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. यानंतर आता दीपिकाचे चाहते तिनं दिलेल्या गुड न्यूजमुळे खूप खुश आहेत. तसेच या जोडप्यानं आपला आनंद व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर जोडप्यानं लिहिलं," वेलकम बेबी गर्ल 8.9.2024 दीपिका आणि रणवीर." दरम्यान या जोडप्यानं शेअर केलेल्या पोस्टवर बॉलिवूड स्टार्सनी प्रेमाचा वर्षाव केला होता. आलिया भट्ट, क्रिती सेनॉनपासून ते अर्जुन कपूरपर्यंतच्या स्टार्सनं कमेंट सेक्शनमध्ये रणवीर आणि दीपिकाचे अभिनंदन केलं होतं.

स्टार्सनं दिल्या शुभेच्छा : दरम्यान काही चाहते देखील या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहेत. दीपिका आणि रणवीर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर एका बाळाचे पालक झाले आहेत. दरम्यान एका व्हायरल होत असलेल्या पोस्टवर अर्जुन कपूरनं लिहिलं होतं, "लक्ष्मी आली आहे, द क्वीन इज हियर." यावर मीरा राजपूतनं लिहिलं होतं, "अभिनंदन, बेबी क्लबमध्ये आपलं स्वागत आहे."प्रियांका चोप्रा, अनन्या पांडे, गौहर खान, श्रद्धा कपूर, पूजा हेगडे, वाणी कपूर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या स्टार्सनी देखील 'दीपवीर'ला शुभेच्छा दिल्या होत्या. आता काही यूजर्स दीपिका आई बनल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत आहेत. या पोस्टवर आता अनेकजण दीपिकाच्या मुलीचं नाव काय ठेवायचं हे सूचवत आहेत.

रणवीर आणि दीपिकाच्या मुलीचं नाव चाहत्यांनी सूचवलं : चाहत्यांनी सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाच्या लाडक्या मुलीसाठी नाव सूचवताना लिहिलं, "तिचं नाव 'रिद्धी' ठेवायला पाहिजे." यानंतर चाहत्यानं या नावामागील अर्थही सांगितला आहे. दुसऱ्या एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "रविका हे नाव खूप सुंदर असेल." रविका, दीपिका आणि रणवीर यांच्या नावानुसार बनवण्यात आलं आहे. रविका नावाचा अर्थ हा सूर्यकिरण होतो. याशिवाय अनेकांनी रुहानी आणि राधिका अशी नावंही सूचवली आहेत. आता अनेकजण हीच वाट पाहात आहे की, रणवीर आणि दीपिका आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार आहेत. दरम्यान शनिवारी दीपिका मुंबईतील एचएन गिरगाव परिसरात स्पॉट झाली होती. तिला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पाहिलं गेलं होतं. तिच्या प्रसूतीपूर्वी शुक्रवारी दोघांनीही कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं होतं. शनिवारपासून गणेशोत्सव सुरू होत असल्यानं, शुभ दिवशी बाळाचं स्वागत करण्यासाठी कुटुंबांनी प्रसूतीसाठी योग्य वेळ निवडला. दीपिकानं मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात मुलीला जन्म दिला. दरम्यान यावर्षीच फेब्रुवारीमध्ये 'दीपवीर'नं गर्भधारणेची घोषणा करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. याशिवाय त्यांनी सप्टेंबरमध्ये बाळ येणार असल्याचंही सांगितलं होतं.

हेही वाचा :

  1. सिद्धिविनायक पावला; दीपिका -रणवीरच्या घरी गणेशोत्सवात आली 'लक्ष्मी' - Ranveer Deepika first child
  2. दीपिका पदुकोणच्या पहिल्या मॅटर्निटी फोटोशूटला 24 तासाच्या आत मिळाले 50 लाखांहून जास्त लाईक्स - DEEPIKA PADUKONE
  3. दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट आली समोर, कधी होणार आई जाणून घ्या... - RANVEER SINGH and Deepika Padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.