ETV Bharat / state

जळगाव हादरलं! 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन डोकं दगडानं ठेचलं; 'नराधमाला फाशी द्या' संतप्त जमावाची मागणी - Minor Girl Rape Murder Case - MINOR GIRL RAPE MURDER CASE

Minor Girl Rape Murder Case : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसतंय. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चोपडामधून संतापजनक प्रकार समोर आलाय. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे.

12 year old girl murder after sexually assault in chopda jalgaon
जळगावमध्ये 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 11:00 AM IST

जळगाव Minor Girl Rape Murder Case : राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. बदलापूरच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरलेला असताना राज्यातील विविध भागांमधून महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातही अशीच घटना घडल्याचं समोर आलंय. नराधमानं एका 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्यानं मुलीला दगडानं ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळं चोपडा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. नराधमाला फाशी देण्यात यावी, अशी मागणी संतप्त जमावाकडून केली जात आहे.

जळगावमध्ये 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या (ETV Bharat Reporter)
अत्याचार करुन केली हत्या : 7 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेतातील निंदणाचं काम आटोपून पीडिता आपल्या लहान बहिणीसह रस्त्यानं आपल्या गावाकडं निघाली होती. या दरम्यान आरोपीनं तिला एका शेतात ओढूत नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्या केली. पीडितेच्या बहिणीनं गावकऱ्यांना घटनेसंदर्भात माहिती दिली. गावकऱ्यांनी मुलीचा शोध घेतला असता, एका शेतामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

आरोपीवर गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमसह चोपडा परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथकं तयार केली. त्यानंतर चोपडा-आडगाव रस्त्यावर आरोपी पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. त्याच्यावर पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी दिलीय.

'नराधमाला फाशी द्या' : घटनेच्या निषेधार्थ रविवारी (8 सप्टेंबर) चोपडा इथं मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत 'नराधमाला फाशी द्या' अशी मागणी केली. यावेळी आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं.

हेही वाचा -

  1. धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case
  2. तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide
  3. ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.