बजरंग पुनियाचे ग्रँड स्वागत; उघड्या जीपमधून काढली मिरवणूक - tokyo olympics 2020
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज भारतात परतला आहे. देशात परतल्यानंतर पदक विजेत्या खेळाडूचे जंगी स्वागत करण्यात आले. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळाबाहेर बजरंगला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळाबाहेर आल्यानंतर बजरंगची जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. चाहत्याचे प्रेम पाहून बजरंग भारावला.