VIDEO : विरुष्काच्या आयुष्यात आली 'वामिका' - vamika latest news
🎬 Watch Now: Feature Video
क्रीडा आणि बॉलिवूडमध्ये 'पॉवर कपल' अशी ओळख असलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीचे पहिले छायाचित्र शेअर केले आहे. तसेच या फोटोत विरुष्काच्या मुलीचे नावही सांगण्यात आले आहे. प्रसूत झाल्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानत आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवल्याचे सांगितले आहे.