Union Minister Nitin Gadkari : ...तर राजकारण सोडेन! नितीन गडकरींचे थेट आव्हान - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई लायब्रेरीच्या उदघाटन
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - देशभरात 50 लाख करोड रुपयांचे रस्त्याचे जाळे विणण्याचे काम केले. (Atal Bihari Vajpayee e-Library) नागपुरात 86 हजार करोड रुपयांचे काम केले, पण एकही ठेकेदाराकडून कमीशन घेतले नाही. एक जरी ठेकेदार येऊन कमिशन खाल्ले म्हणाला तर राजकारण सोडून देईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. (Inauguration Atal Bihari Vajpayee e-Library) ते नागपूरमध्ये आयोजित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई लायब्रेरीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी लायब्रेरीच्या झालेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. पैसे कमावणे चुकीचे नाही. मात्र, राजनीती हा पैसे कामावण्याचा धंदा ही नाही असे म्हणत महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST