'चित्रतपस्वी' व्ही. शांताराम, 'अशी घडली कारकिर्द...! - v shantaram film carrer
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय चित्रपटसृष्टीत चित्रपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही. शांताराम यांची आज ११८ वी जयंती आहे. १८ नोव्हेंबर १९०१ मध्ये कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून चौफेर कामगिरी बजावली. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. सुमारे सहा दशकं चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या बापूंनी भारतीय चित्रपटसृष्टीला एका पेक्षा एक असे दर्जेदार चित्रपट दिलेत.