'द स्काय इझ पिंक' प्रमोशन: गुलाबी शहरात 'देसी गर्ल'चा अनोखा जलवा - rohit saraf
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - बॉलिवूडची 'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रा आगामी 'द स्काय इझ पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर, रोहित सराफ आणि अभिनेत्री झायरा वसिम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. अलिकडेच प्रियांकाने गुलाबी शहर जयपूर येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. दरम्यान, 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलताना प्रियांका आणि रोहितने या चित्रपटाबद्दलचे बरेच किस्से उलगडले. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.