'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ - tanhaji film latest news
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर - छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ मावळे तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यकथेवर आधारित 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबतची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.