Dilip kumar died : पहा 'राम और श्याम' चित्रपटातील दिलीपजींचे बहारदार गाणे - evergreen song
🎬 Watch Now: Feature Video
आपल्या देखणा चेहरा, त्याला साजेशी शरीरयष्टी आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. यानिमित्ताने 'राम और श्याम' या चित्रपटातील 'आयी हे बहारे आए झुल्मो सितम' हे गाणे खास प्रेक्षकांसाठी. १९६७ ला रिलीज झालेला 'राम और श्याम' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या चित्रपटात त्यांचा डबल रोल होता. मुमताझ, निरुपमा रॉय, वहिदा रेहमान यांच्या अभिनयाची भट्टी चांगलीच जमली होती. या चित्रपटाला फिल्मफेयरचा उत्कृष्ट चित्रपट, सहाय्यक नायिका आणि उत्कृष्ट नायकाचा पुरस्कार मिळाला होता.