ऋषी कपूर आणि इरफान खानच्या रुपात भारतीय सिनेसृष्टीने २ तारे गमावले - अश्विनी भावे - Ashwini Bhave on Rishi Kapoor
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता इरफान खान आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. इरफान खान यांच्या निधनातून सिनेसृष्टी सावरत नाही, तोच ऋषी कपूर यांच्याही निधनाची बातमी येऊन धडकल्यामुळे सिनेसृष्टीवर मोठा आघात झाला आहे. दोघांच्याही रुपात प्रतिभावंत कलाकार सिनेसृष्टीने गमावले आहेत, अशी भावना अभिनेत्री अश्विनी भावे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत 'हिना' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऋषी कपूर यांच्या करिअरमधल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असा ठरला होता.