‘मी होणार सुपरस्टार’ : स्पर्धकांच्या परफॉर्मन्सेसनंतर मलाही नाचावं वाटतं - संस्कृती बालगुडे! - संस्कृती बालगुडे
🎬 Watch Now: Feature Video
मराठी मनोरंजनसृष्टीतील एक ग्लॅमरस नाव म्हणजे संस्कृती बालगुडे, आता एका नवीन क्षेत्रात पदार्पण करतेय. अप्रतिम नृत्यांगना आणि सशक्त अभिनेत्री असणाऱ्या संस्कृतीने मराठी मालिका आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका केल्यात. ‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमातून संस्कृती पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
संस्कृतीला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा ग्लॅमरस अंदाज अनोखा असणार आहे. संस्कृती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने टेलिव्हिजन धमाकेदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. ती तब्बल ८ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करतेय.
आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संस्कृती बालगुडेने गप्पा मारल्या त्याचा हा व्हिडीओ...