Shivsena Agitation In Pune : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचे तिरडी आंदोलन - शिवसेनेचे गॅस पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14825232-thumbnail-3x2-shivsena.jpg)
पुणे - उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ते संकेत खरे ठरले आहेत. निकालानंतर झपाट्याने दरवाढ होत आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या या भाववाढीच्या विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तिरडी आंदोलन ( Shivsena Agitation In Pune ) करण्यात आले. तसेच, दहा दिवसांत भाववाढ कमी नाही केली, तर आम्ही दशक्रिया विधी आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST