समाजाच्या हितासाठी उपोषणाचा निर्णय महत्त्वाचा; संभाजीराजेंच्या पत्नीसोबत 'ईटीव्ही'ने केली बातचीत - संभाजीराजे छत्रपती उपोषण थांबवले
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati Protest) यांनी मुंबईतील आझाद मैदानात गेले तीन दिवस उपोषण केले होते. राज्य सरकारकडून संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र, या उपोषणाच्या तीन दिवसात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे (Sanyogeetaraje) या देखील ठामपणे त्यांच्या मागे उभ्या होत्या. संभाजीराजे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे आपल्याला आधी सांगितले नव्हते. मात्र, राजेंच्या निर्णयाबाबत आपल्याला समजल्यानंतर आम्ही नाराज झालो. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत घरात भांडणही झाले. मात्र, समाजाच्या हितासाठी उपोषणाचा निर्णय महत्त्वाचा असल्याने आपणही पाठिंबा दिला. गेले तीन दिवस संभाजीराजे यांनी उपोषण केले. त्याप्रमाणे आपणही अन्न खाल्ले नसल्याचे संयोगिता राजे यांनी सांगितले. तसेच त्यांनी केलेल्या उपोषणामुळे मराठा समाजाला येणाऱ्या काळात मोठा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST