Rang Panchami : कोल्हापुरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी - रंग पंचमी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमीचा सण ( Rang Panchami ) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे सर्वच सण व उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केले गेले. मात्र, यंदा निर्बंध शिथील झाल्यामुळे कोल्हापूरकर रंग पंचमीच्या रंगात न्हाऊन निघाले. सकाळपासूनच महिला व तरुणी एकत्र येत चित्रपटांच्या गाण्यावर ठेका धरत रंग खेळला. दरम्यान, या कार्यक्रमास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील ( MLA Ruturaj Patil ) यांनी अचानक भेट दिल्याने अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. तसेच गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आमदार ऋतुराज पाटील यांनाही आवरता आला नाही. त्यांनी मनसोक्तपणे नृत्य केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST