VIDEO : निर्बंधमुक्त महाराष्ट्राच्या निर्णयाचा पुणेकरांकडून जल्लोषात स्वागत - पुणेकरांकडून जल्लोषात स्वागत
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - राज्यात कोरोनाचे निर्बंध काढले जाणार की नाही? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. याशिवाय, मास्क घालणे हे देखील बंधनकारक नसेल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. गुढीपाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी लावावा. सरकारच्या या निर्णयावर पुणेकरांनी प्रतिक्रिया देत जल्लोष साजरा केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST