Medicines Rate Hike : सरकारने सामान्य माणसाला लुटायचे ठरवले आहे, औषध दरवाढीवर नागरिकांच्या उद्विग्न प्रतिक्रिया - NPPA
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल, 2022 पासून तब्बल 800 प्रकारच्या जीवनावश्यक औषधांच्या किंमती 11 टक्क्यांनी वाढणार ( Medicines Rate Hike ) आहेत. नॅशनल फार्मासिटिकल प्रायसिंग ऑथोरिटीने ( NPPA ) यासंदर्भातील परवानगी दिली असून एक एप्रिलपासून या औषधांचे नवे दर लागू होतील. यावर सामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने मुंबईतील एका रुग्णालयाबाहेरील काही रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. एका रुग्णाचे नातेवाईक म्हणाले की, "या सरकारने सामान्य माणसाला लुटायचच असे ठरवले आहे. आता औषधाच्या किंमती वाढवत आहेत. पण, आमचा पगार आहे तेवढाच आहे. म्हणजे आता आम्ही उपचारही घ्यायचा नाही का, असा सवाल उपस्थित केला. ज्यांचे वेतन कमी आहे अशी सामान्य माणसे आजारपण अंगावर काढून जे काय होईल ते घरीच होईल, अशा विचाराने उपचार घेणार नाहीत. म्हणजे म्हणजे आता आम्ही असेच मरायचे हेच या सरकारला अपेक्षित आहे."
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST