VIDEO : कनिष्ठ वकिलांना 5 हजार रुपये मानधन द्या; वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका - मुंबई उच्च न्यायालयात वकिलांच्या मानधनासाठी याचिका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कनिष्ठ वकिलांना महाराष्ट्रात देखील 5 हजार रुपये मासिक मानधन मिळाले पाहिजे, नवीन वकिलांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून देण्यात यावे. भारतातील इतर राज्यांमध्ये देखील अशाप्रकारे तरतूद असून मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (सोमवारी) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार बार कौन्सिल आणि गोवा बार कौन्सिल नोटीस बजावली. शिवाय उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. कोरोना काळामध्ये अनेक नवीन वकिलांनी निराश होवून आत्महत्या देखील केली आहे. त्यामुळे या सर्वांना अशा परिस्थितीतून बाहेर काढण्याकरीता महिन्याला 5 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST