Karnataka Dispute युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसला फासले काळे; पहाटे केले आंदोलन - कर्नाटक बसला फासले काळे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 7, 2022, 11:08 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासले. पहाटे कर्नाटकच्या गाड्यांवर जय महाराष्ट्र Jai Maharashtra on Karnataka bus लिहत कर्नाटकच्या नावावर काळे फासण्यात आले. मुख्य बस स्थानकावरून रोज पहाटेच्या सुमारास कर्नाटक कडे जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येतात. त्यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बसवरील कानडी भाषेतील अक्षरांवर काळे फासले, तर भगव्या रंगाने गाडीच्या काचेवर जय महाराष्ट्र लिहिले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी Strong slogans against Karnataka government केली. कर्नाटकातून औरंगाबादेत नऊ बस मध्यवर्ती बस स्थानकात मुक्कामी आल्या होत्या. त्यावेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे माहिती देण्यात आली होती. सीमा वादाच्या अनुषंगाने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळे फासण्याच्या घटना मंगळवारी घेतल्या. त्यामुळे एस टी महामंडळ प्रशासनाने खबरदारी म्हणून शहरातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बस थांबवायचा का नाही ? याबाबत चर्चा केली. काही बस रात्री मुक्कामी थांबल्या होत्या. मात्र पहाटेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसला काळ फासलं त्यामुळे सीमावाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.