Bheem Geet program : गायिका वैशाली माडे यांचा भीम गीतांच्या कार्यक्रमात भीमसैनिक मंत्रमुग्ध; पाहा व्हिडिओ - आदर्श शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
बीड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी महाराष्ट्राच्या आदर्श गायीका वैशाली माडे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला भिम अनुयायांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी सर्वच भीम अनुयायांनी मोबाईल टॉर्च लावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याच दरम्यान भीमगीत सुरू असतानाच डॉ योगेश क्षीरसागर यांनी ठेका धरला. दरम्यान डोळ्याचे पारणे फिटतील असे मनमोहक दृष्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बीड जिल्ह्यात महापुरुषांच्या जयंती निमित्त भीम गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. योगेश क्षीरसागर केले होते. 15 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे आदर्श गायक आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम ही बीड शहरांमध्येच झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रमाची झाल्याने बीड वाशीयांना आनंदाची पर्वणीच मिळाली आहे.