नामदेव जाधवांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक - नामदेव जाधवांवर शाई फेकली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 7:05 PM IST

पुणे Ink Thrown On Namdev Jadhav : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणाचे हिटलर आहेत, अशी टीका लेखक नामदेव जाधव यांच्याकडून करण्यात आली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट आक्रमक झाला आहे. (NCP leader Sharad Pawar) त्यांनी पुण्यात आज लेखक नामदेव जाधव यांच्यावर शाई फेकून निषेध करत आंदोलन केले. अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस कडून भांडारकर इन्स्टिट्यूट मधल्या कार्यक्रमात हा इशारा देण्यात आला होता; परंतु नामदेव जाधव माध्यमाशी बोलत असतानाच ही घटना घडल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी एकमेव पोलीस अधिकाऱ्याने नामदेव जाधवांचा बचाव केला. (Writer Namdev Jadhav)

अखेर कार्यक्रम रद्द : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आज त्यांंच्या पुण्यातील कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या तयारीने आले होते. हे बघता भांडारकर इन्स्टिट्यूट येथे मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा लावण्यात आला होता. अखेर हा कार्यक्रम भांडारकर इन्स्टिट्यूटकडून रद्द करण्यात आलेला आहे. कायदा व सुव्यवस्था आणि संस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता कुठलाही वाद निर्माण होऊ नये म्हणून या संदर्भातली परवानगी आम्ही नाकारत असल्याचं इन्स्टिट्यूटतर्फे पत्र देण्यात आलेलं आहे. तरीही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भांडारकर गेट वरती येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.