Saraswati Vaidya Murder: सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणी महिला आयोग सदस्यांनी घेतली पोलिसांची भेट - महिला आयोग सदस्यांची पोलीस भेट
🎬 Watch Now: Feature Video
पालघर : सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात महिला आयोग सदस्य वकील गौरी छाबरीया आणि उत्कर्षा रूपवते यांनी नया नगर पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी दोन्ही सदस्यांनी पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना भेटून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. आरोपीने ज्या पद्धतीने महिलेची हत्या केली ते फार वेदनादायी आहे; मात्र माणसाच्या मनात असलेली हिंसा जेव्हा संपेल तेव्हा अश्या महिलांच्या क्रूर हत्या बंद होतील, असे मत महिला आयोगाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. आपण त्रासदायक नात्यामध्ये अडकलेलो आहोत, असे महिलांना वाटत असेत तर त्यांनी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असलेल्या पार्टनरसोबत भांडण होत असेल तर आपण महिला आयोग किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असा सल्ला महिला आयोग सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी दिला आहे.