Shraddha Murder Case श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी महिलेने महापंचायतीच्या मंचावरच पुरुषाला चप्पलने मारले, पाहा व्हिडिओ - Hindu organizations called mahapanchayat
🎬 Watch Now: Feature Video
Shraddha Murder Case नवी दिल्ली दिल्लीतील छतरपूर येथे हिंदू एकता मंचने आयोजित केलेल्या 'बेटी बचाओ महापंचायत'मध्ये मोठा गोंधळ झाला. स्टेजवर चढून महिलेने एका व्यक्तीला चप्पलने मारहाण केली. त्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. श्राद्धाला न्याय मिळावा यासाठी महापंचायत बोलावण्यात आली होती. तेव्हा हा प्रकार घडला आहे. त्या व्यक्तीने महिलेला भाषण संपवण्यास सांगितले, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने त्याला चप्पलने मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलेने स्कार्फने चेहरा झाकलेला आहे. महिलेच्या मुलीने आपल्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याचेही बोलले जात आहे. यामुळे महिलेला राग येतो. ती स्टेजवरून तेच बोलत होती, तेवढ्यात त्याने येऊन तिचा माईक हिसकावून घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST