World Bicycle Day 2023: 'या' कारणामुळे करतात जागतिक सायकल दिवस साजरा - सायकल महापौर चिराग शाह
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना अनेक साधने उदयास आली आहेत. या धावत्या जगात अनेक प्रकारची वाहने देखील रस्त्यावर दिसू लागली असताना सायकल लोप पावत चालली आहे. सायकल चालवण्याने अनेक फायदे होतात. मात्र वेळेअभावी सायकल चालवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचे महत्व पटवून देण्यासाठी सायकल दिन साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी जागतिक सायकल दिन 3 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक वाहने आल्याने लोकांचे रस्त्यावर फिरण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेकजण स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय स्नायू बळकट होतात. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सायकल चालवणे हा देखील एक चांगला उपक्रम आहे. पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास ते उपयुक्त आहे. तसेच सायकल चालवताना कोणतेही इंधन खर्च होत नाही. अनेकांना सायकल चालवण्याचीही आवड असते. हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे सायकल चालवणे सुरूच ठेवले पाहिजे. दरम्यान सायकल चालवण्याचे फायदे काय ? सायकल विक्रेत्याचे म्हणणे काय? हे सायकल महापौर चिराग शाह यांच्याकडून ऐकू या. सायकल महापौर हे आर्थिक, सामाजिक, आरोग्य आणि पर्यावरणीय फायदे उघड करण्यासाठी कार्य करतात, ज्यामुळे सायकलिंग वाढू शकते.