मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालावी? पाहा व्हिडिओ - कोणत्या रंगाची साडी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 14, 2024, 10:14 PM IST
जालना Makar Sankranti २०२४ : मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालू किंवा नये यासाठी वेगवेगळ्या अफवा सध्या गावागावांमध्ये पसरवल्या जात आहेत. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये (Makar Rashi) प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत पर्वकाल निर्माण होतो. हा वर्षातला सर्वात मोठा हा पर्वकाल आहे. त्यामुळं मोठ्या श्रद्धेनं वाण दान करावं. मात्र, सध्या गावागावांध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या कलरची साडी घालावी? यासाठी अफवा सुरु आहेत. मात्र, या दिवशी तुम्ही कोणत्याही कलरची साडी नेसू शकता किंवा कोणतेही वाण देवू शकता. त्याचबरोबर सकाळपासून ते सूर्यास्तापर्यंत आपण मकर संक्रांत साजरी करू शकतो, असं म्हणत महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन ज्योतिषाचार्य राजेश महाराज सावनगावकर यांनी केलंय.