ETV Bharat / state

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयानं कोल्हापूर आणि सांगलीकर धास्तावले, पुन्हा पडणार महापुराचा विळखा? - ALMATTI DAM HEIGHT

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. या धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ALMATTI DAM HEIGHT
अलमट्टी धरण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

कोल्हापूर : कर्नाटकचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतल्यानं या निर्णयाचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत. अलमट्टी धरणामुळं कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. जर अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगलीला पुन्हा एकदा महापुराला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्रानं विरोध करावा, अशी मागणी आता सांगली आणि कोल्हापुरातील जनतेकडून केली जात आहे.

तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. 123 टीएमसी क्षमता असलेलं अलमट्टी धरण हे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार असल्याच्या तक्रारी साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही सरकारं आमने-सामने येणार आहेत. अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन आहे. त्यामुळं धरणातील पाणीसाठा आणखीन वाढणार असून सिंचन आणि इतर क्षेत्रात वाढ होणार असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे. मात्र, अलमट्टी धरणामुळं पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट येऊन हजारो कोटींचं नुकसान अलिकडच्या काळात नेहमीच होतं. 2005, 2019 आणि 2021 या वर्षी आलेल्या महापुराच्या संदर्भात वडनेरे समितीच्या अहवालात कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. मात्र, पुन्हा उंची वाढवण्याचा निर्णय चर्चेत आल्यानं धरणाच्या बॅकवॉटरचा आणि धरणामुळं येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, असं आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केलं आहे.

कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळं सांगली-कोल्हापुरात पुराचा धोका वाढणार (Source - ETV Bharat Reporter)

शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता : "अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर येण्याची शक्यता आहे. त्यातच 2005, 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरानंतर अलमट्टी धरणामुळं कोल्हापूरला महापुराचा फटका बसल्याचा निष्कर्ष नंदकुमार वडनेरे समितीनं काढला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कृष्णा, पंचगंगा वारणा नदीच्या खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात असणारी जमीन पुराच्या पाण्याखाली जाणार, यामुळं येथील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे," असं पूरग्रस्त भागांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अवधूत भाट्ये यांनी सांगितलं.

उंची वाढल्यास पुन्हा महापुराचा विळखा : सध्या अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर उंची असल्यानं धरण भरल्यानंतर बॅकवॉटरच्या पाण्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावांना महापुराचा विळखा पडतो. जर धरणाची उंची पुन्हा वाढल्यास महाप्रलयकारी पूर या भागात येण्याची शक्यता असल्यानं सांगली कोल्हापूरकरांचा या निर्णयाला विरोध वाढत आहे. राज्य सरकारनंही केंद्र सरकारकडे याबाबतचा पाठपुरावा करून अलमट्टीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

हेही वाचा

  1. पुण्यात वर्षभरात साडेपाच हजार जोडप्यांनी केलं 'कोर्ट मॅरेज'
  2. Lesbian marriage: महिलेनं गर्भवती मैत्रिणीसोबत मंदिरात केलं लग्न, म्हणाली.. पतीसारखं पूर्ण प्रेम देईन!
  3. How Marriage Ritual Starts : लग्नकार्याची परंपरा कधी आणि कशी सुरु झाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.