योजना केंद्र सरकारच्या, मग संकल्प यात्रेच्या रथावर मोदींचं नाव का? पिसाळवाडी ग्रामस्थांनी नाव झाकायला लावले - Vikasit Bharat Sankalp Yatra

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 8:35 PM IST

सातारा Vikasit Bharat Sankalp Yatra : केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. (Sankalp Yatra Rath) गुरुवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यातील पिसाळवाडी (ता. खंडाळा) येथे आली होती. (PM Narendra Modi) विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत. कोणा व्यक्तीच्या नाहीत, असा पवित्रा घेत पिसाळवाडी ग्रामस्थांनी संकल्प यात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव स्वयंसेवकांना झाकायला लावलं. (Pisalwadi Village) पिसाळवाडी गावात घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण खंडाळा तालुक्यात चर्चा आहे. अशीच घटना कोरेगाव तालुक्यातील दिघी गावात देखील घडली. ''रथावर हे असं का लिहलंय, हे आम्ही विचारू शकत नाही का'', असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला. जनता आता वैतागली आहे, (Central Govt Scheme) असा त्रागा करत संकल्प यात्रेचा रथ गावातून बाहेर काढला. 'विकसित भारत संकल्प यात्रा' हा एक सरकारी उपक्रम असून आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी इत्यादी केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.