Vani Taluka in Yavatmal Under Flood Video : यवतमाळच्या वनी तालुक्यातील सात गावांना पुराचा वेढा, पाहा ड्रोन दृष्ये - Evacuated by Boat Today
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ जिल्ह्यातील ( Yavatmal Under Flood Video ) वनी तालुक्यात ( Vani Taluka Flood Water ) आज तिसऱ्या दिवशीदेखील सात गावांना पुराचा वेढा ( seven villages are still under flood ) कायम आहे. तर काही गावांमध्ये पूर ओसरला आहे. तर पुराचा वेढा असलेल्या गावातील 84 आजारी नागरिकांना बोटीद्वारे आज बाहेर ( Evacuated by Boat Today ) काढण्यात आले आहे. त्यांच्यावर मेडिकल कॅम्पमध्ये उपचार सुरू आहे. पूरपरिस्थितीदरम्यान त्या परिसरातील ड्रोनद्वारे टिपलेले काही क्षणचित्रे. वनी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली, जुगाद या गावांना पाण्याचा वेढा आहे. तसेच, सेलू, झोला, रांगणा, कोना, पिंपळगाव, नायगाव, उकणी या गावांतील पूर ओसरला असून, वाहतुकीसाठी मार्ग सुरळीत झाला आहे. पूरग्रस्त भागात घरातील पाणी उतरल्यानंतर आज अनेक घरांमध्ये गाळ साचला गेला आहे. याशिवाय आज पुराचा वेढा असलेल्या शेलू येथील 10 आजारी लोक, कवडशी 4, शिवणी -18, चिंचोली -52 लोकांना बाहेर बोटीद्वारे काढण्यात आले व शिवणी गावात डॉक्टरला पाठवण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST