UP Car fire : अंबाला-डेहराडून महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, कारमधील 4 जणांचा होरपळून मृत्यू - सहारनपूरमध्ये अपघात
🎬 Watch Now: Feature Video
लखनौ : रामपूर तालुक्यातील मनिहरान परिसरातील अंबाला-देहरादून महामार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावर धावणाऱ्या कारने अचनाक पेट घेतला आणि कार जळून खाक झाली. या कारमध्ये असलेले चार प्रवाशी यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृत झालेले प्रवाशी एकाच कुटुंबातील होते. धावत्या कारला अचानक आग लागल्याने महामार्गावरून जाणाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणाला काही समजेपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. गाडीला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील ज्वालापूर शहरात राहणारे एक कुटुंब अंबाला-डेहराडून महामार्गावर कारमधून जात होते. सहारनपूर पोलीस स्टेशनच्या रामपूर मणिहरन भागात कार पोहोचताच अचानक आग लागली. कार चालक व कुटुंबीयांना काही समजेपर्यंत आगीची तीव्रता वाढली होती.