Unseasonal Rain : पुढील आठवड्यात राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

By

Published : Apr 16, 2023, 7:38 PM IST

thumbnail

पुणे : मध्य महाराष्ट्र येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस पडेल असे हवामान विभागाने अदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाडा येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा वीदर्भ येथे देखील पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यात देखील आकाश मुख्यतः निरभ्र राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अती हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती यावेळी हवामान विभागाच्या हवामान शास्त्रीय ज्योती सोनार यांनी दिली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलं असून राज्यातील अनेक भागात सकाळी कडक ऊन, दुपारी जोरदार पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण गोवा या ठिकाणी पुढील आठवडाभर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Atiq Ashraf Wife : अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, अशरफची पत्नी जैनब करू शकतात सरेंडर; पोलीस अलर्ट

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.