तोंडाने पेढा भरवून खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! - Udayanraje at activist birthday satara
🎬 Watch Now: Feature Video

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच ते कधी काय करतील याचा नेम नसतो. याचा प्रत्यय मंगळवारी रात्री आला. तोंडाने पेढा भरवत एका कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गोडोलीतील त्यांचा कार्यकर्ता विनोद मोरे याला वाढदिनी उदयनराजेंनी तोंडाने पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST