Uday Samant News : 17 हजार कोटींचा हिरे उद्योग मुंबईतून गुजरातमध्ये; उदय सामंत म्हणाले, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात..

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 11:36 AM IST

Updated : Oct 27, 2023, 1:03 PM IST

thumbnail

नागपूर Uday Samant News : देशातील सर्वात मोठा डायमंड क्लस्टर नवी मुंबईमध्ये होणार आहे. यानंतर देशातील बहुतांश लोक हे नवी मुंबई तसंच महाराष्ट्रात येणार आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार जात असतो.  मी आता सुरतहून नंदुरबार आणि नवापूरला गेलो होतो. तिथे गुजरातची एक टेक्सटाईल कंपनी येणार आहे. देशातील सर्वात मोठं डायमंड क्लस्टर नवी मुंबईत होणार आहे.  यात गुंतवणूक झाल्यावर उद्योगमंत्री म्हणून मी स्वतः तुम्हाला गुजरात आणि महाराष्ट्रात किती उद्योग आहेत हे सांगेल असंही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज सकाळी वर्धा इथं जाण्याआधी नागपूर विमानतळावर बोलत होते. तसंच काही व्यापारी महाराष्ट्रातून सुरतला गेले यावर त्यांना विचारलं असता, असं काही नसून फक्त असं वातावरण तयार केलं जात असल्याचंही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. किरण जेम्सचे संचालक अब्जाधीश हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी 17,000 कोटींचा व्यवसाय मुंबईतून सुरतमधील सुरत डायमंड बोर्स (SDB) मध्ये स्थलांतरित केला आहे. 

Last Updated : Oct 27, 2023, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.