पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळं पुण्यातील विविध पेट्रोल पंपांवर गर्दी; पाहा व्हिडिओ - pune news
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 2, 2024, 1:52 PM IST
पुणे Pune Petrol Pump : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलाय. सरकारनं या कायद्यात दुरुस्ती करावी, अशी ट्रक चालकांची मागणी आहे. अन्यथा सलग तीन दिवस संप सुरू असेल, असा इशारा ट्रक चालकांच्या संघटनांनी दिलाय. त्याच्या परिणामी इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातं असतानाच सोमवारी (1 जानेवारी) रात्री पुढील तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहतील, अशी अफवा पसरली. त्यामुळं रात्री पुणे शहरासह सर्वत्र नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यानंतर या संपाचा पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी स्पष्ट केलं. मात्र, तरीदेखील पुण्यातील विविध पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली आहे.