पेट्रोल पंपावरील इंधन संपण्याची नागरिकांना भीती; नागपुरात वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा - low fuel stock
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 2, 2024, 11:38 AM IST
नागपूर : नागपूर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा रागल्या आहेत. ट्रक आणि टँकर असोसिएशननं नवीन मोटार वाहन कायद्या विरोधात आंदोलन सुरू केले आहेत. त्या अंतर्गत टँकर चालक ही संपात सहभागी झाले असल्यानं पेट्रोल, डिझेल पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जातं आहे. त्यामुळं नागपुर शहरातल्या सर्वचं पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. केंद्राच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक आणि टॅंकरचालकांनी अनिश्चितकालीन आंदोलन पुकारल्याने पंपांवर नवीन वर्षाच्या पेट्रोल आणि डिझेलचे टँकर पोहोचले नाहीत. आज दिवसभर पुरेल इतकाचं पेट्रोल साठा शिल्लक आल्याची चर्चा लोकांमध्ये पसरली आहे. लोकांनी सकाळपासूनचं पेट्रोल पंपांवर धाव घेतली आहे. जर टँकर चालकांनी आज संप मागे घेतला नाही तर संध्याकाळपर्यंत नागपूर शहरातील किमान ९० टक्के पंप 'ड्राय' म्हणजे इंधन संपण्याची भीती निर्माण झाली आहे.