Gas cylinder truck fire: गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग...बॉम्बप्रमाणे झाला स्फोट, पहा व्हिडिओ - gas cylinder burst due to fire

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 29, 2023, 11:00 AM IST

डेहराडून: उत्तराखंडमधील एलपीजी सिलिंडरचा मोठा अपघात झाला आहे.  टिहरीमध्ये एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली. टिहरी जिल्ह्यातील कांदिखल मगरजवळ ही आगीची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  सिलिंडर ट्रकला आग लागल्याने एकाचवेळी 40 सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटांच्या आवाजाने ट्रकमधील गॅस सिलिंडर दूरवर जाऊन आदळले. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. पण आग इतकी भीषण होती की लोकांना ती विझविणे अशक्य झाले. स्फोटानंतर  गॅस सिलिंडरने भरलेल्या संपूर्ण ट्रकने पेट घेतला. काही वेळातच ट्रक जागेवर जळून खाक झाला. अपघाताची तीव्रता पाहता ट्रकमध्ये बसलेल्या चालक व क्लीनरने मोठे प्रयत्न करत स्वत:चे प्राण वाचविले. एलपीजी सिलिंडर घेऊन हा ट्रक घणसाळीच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.