Hyva Truck Accident: विरारमध्ये रस्त्यातच उलटली हायवा ट्रक; तीन जणांचा मृत्यू - विरारमध्ये अपघात
🎬 Watch Now: Feature Video
पालघर : विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावर एक हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकखाली सापडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास नारिंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा ट्रक जात होता. मात्र भर वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्यात ट्रकचे नियंत्रण सुटले. ट्रक थेट रस्त्याकडेला उलटला. या ट्रकखाली तिघेजण सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन पथकाच्या जवानांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले आहे. हा ट्रक मालाने भरलेला असल्याने तीन क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक आता बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.