पिरंगुट घाटात भयंकर अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षानं सर्वसामान्यांचा जातोय बळी - पिरंगुट घाटात भयंकर अपघात
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 21, 2023, 2:05 PM IST
पुणे : Accidents in Pirangut Ghat : पुणे-कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटातून पौडच्या दिशेनं विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोनं पाच दुचाकी तर एका कारला धडक दिली. विटा घेऊन जाणारा टेम्पो उलटला आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. एक डॉक्टर असून ते गंभीर जखमी झालेले आहेत. मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं त्यानं अनेक वाहनांना उडवलं यातील प्रवासी गंभीर जखमी झालेत तर काही जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पिरंगुट घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिकाच सुरू असून स्थानिक प्रशासन त्याकडं दुर्लक्ष करत आहे. उतारावर अपघात रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना प्रशासन करत नसल्यानं, दर आठवड्यात इथं भयंकर अपघात होत असतो. मालवाहू टेम्पोचा ताबा सुटून पाच दुचाकी आणि एका कारला धडकून हा टेम्पो चालक फरार झाला असून हा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या पिरंगुट घाटात अपघाताची शृंखला सुरूच असून अनेक जणांचे प्राण गेलेत तर शेकडो प्रवासी जखमी झालेत. त्यामुळं मुळशीतील नागरिक आक्रमक झाले असून पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी त्वरित पाहणी करून तातडीनं उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी मागणी होऊ लागलीय.