Action On Sand Mafia: तहसीलदार सुनील सावंत यांनी स्वीकारला पदभार; वाळू माफियांना बसणार लगाम
🎬 Watch Now: Feature Video
छत्रपती संभाजीनगर (वैजापूर) : पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील 2 वाळू घाटाचा लिलाव झाला आहे. वैजापूर तालुक्यातील बाभूळगांव व वाजरगांव या ठिकाणी हे वाळूचे ठेके सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली लक्षात घेऊन हा वाळू ठेका चालवणे गरजेचे असताना, मात्र शासनाचे नियम पायदळी तुडवून हा उपसा सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे वाळू उत्खननाची परवानगी नसतांना देखील जेसेबी व पोकलेनच्या सह्याने दिवसा ही वाळू तस्करी जोमात सुरु आहे. एवढे सर्व खुलेआम सुरु असतांना महसूल प्रशासन शांत का? असा प्रश्न विचारला जात आहे. मागील आठवड्यातच वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांची बदली झाली. त्यांच्या जागी सुनील सावंत यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील सावंत हे रुजू होताच, वैजापूरात वाळू तस्करीचे प्रकरण सुरु झाले. त्यामुळे सुनील सावंत यांच्या समोर वाळू तस्करी थांबवण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या काही दिवसामध्ये विरगांव पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने कुठलीही कारवाई न केल्याने "हमे अब कोई रोकनेवाला नहीं, असे म्हणण्याची वेळ वाळू तस्करांवरती आली आहे.