बेनोनी (दक्षिण आफ्रिका) History in T20I Cricket : T20I क्रिकेटमध्ये दररोज अधिकाधिक विक्रम होतात आणि मोडले जातात. अनेक वेळा खेळाडू असे रेकॉर्ड बनवतात जे केवळ खेळाडूसाठीच नाही तर संपूर्ण संघासाठी खूप महत्त्वाचे असतात. असाच काहीसा विक्रम 27 नोव्हेंबरला झालेल्या T20 सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला ज्यात एका खेळाडूनं असा विक्रम केला जो आजच्या आधी त्या संघाला करता आला नव्हता.
So good, Danni Wyatt-Hodge 👊
— England Cricket (@englandcricket) November 27, 2024
Match centre: https://t.co/A2qI6HgI7D#SAvENG | #EnglandCricket pic.twitter.com/47JqX38cpI
विक्रमी धावा करणारी पहिलीच क्रिकेटपटू : वास्तविक, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची T20I मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकला होता. यानंतर दुसरा सामना विलोमूर पार्क, बेनोनी इथं झाला. यात प्रथम फलंदाजी करताना डॅनियल व्याट-हॉज आणि नेट सायव्हर-ब्रंट यांनी अप्रतिम खेळी खेळली. अशाप्रकारे इंग्लंडनं आपल्या 20 षटकांत 4 गडी गमावून 204 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यादरम्यान डॅनियल व्याट-हॉजनं अवघ्या 45 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 78 धावांची खेळी केली. या खेळीमुळं डॅनी व्याटनं T20I क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला. T20I क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारी डॅनी व्याट ही इंग्लंडची पहिलीच खेळाडू ठरली. इतकंच नाही तर ती इंग्लंडची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे, जिनं क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 3000 धावा करण्याचा मोठा पराक्रम केला आहे.
We take an unassailable lead in the T20I series 🤩#SAvENG | #EnglandCricket pic.twitter.com/XLwXahPrEj
— England Cricket (@englandcricket) November 27, 2024
डॅनी व्याटचा विशेष यादीत समावेश : हे लक्षात घेण्यासारखं आहे की डॅनी व्याट ही पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात T20I मध्ये 3000 धावा करणारी जगातील 19 वी क्रिकेटपटू आहे. तर अशी कामगिरी करणारी ती जगातील 10वी महिला क्रिकेटपटू आहे. महिला क्रिकेटपटूंनी आता T20I क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करण्यात पुरुष क्रिकेटपटूंना मागं टाकलं आहे. T20I मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे तर महिलांमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स पहिल्या स्थानावर आहे.
Four wickets from Sarah Glenn helped England claim a T20I series-clinching victory over South Africa in Benoni 🙌
— ICC (@ICC) November 27, 2024
Scorecard: https://t.co/Iv2jWIjDtN pic.twitter.com/oV9Bxayl2G
इंग्लंडनं जिंकली मालिका : या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडनं दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 168 धावा करता आल्या. अशा प्रकारे, इंग्लंडनं हा सामना 36 धावांनी जिंकला आणि 3 सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला सेंच्युरियन येथील स्पोर्ट्स पार्कवर खेळवला जाईल.
हेही वाचा :