पुणे नगर महामार्गावर टँकर पलटी; मोठ्या प्रमाणात वायुगळती, वाहतूक विस्कळीत - गँस गळती
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 27, 2023, 9:08 AM IST
पुणे Tanker Overturns : पुणे नगर महामार्गावर वडगाव शेरी चौकालगत टँकर पलटी झाल्यानं अपघात झालाय. यामुळं याठिकाणी मोठ्या प्रमाणात वायुगळती झालीय. वायुगळतीमुळं मोठया प्रमाणात आग आणि स्फोट होण्याचा धोका निर्माण झालाय. यामुळं या रस्त्यावरील वाहतूकही नियंत्रित करण्यात आलीय. हा रस्ता व्यवस्थित सुरु होण्यासाठी अजून दोन तास लागणार आहेत. अपघातग्रस्त टँकर पुण्याहून नगरच्या दिशेनं जात होता. यादरम्यान सकाळच्या सुमारास टँकर वडगाव शेरी चौकालगत आल्यावर चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळं टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गँस गळती सुरु झाली. स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून टँकरवर स्प्रे मारण्याचं काम सुरू आहे.