Tanker Accident: बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात; ऑइल गोळा करण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी - Tanker accident on BRT Road
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यातील चंदन नगर भागातील बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात झाला आहे. टँकरमधील ऑइल गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे चंदन नगर भागातील रस्त्यावर ऑइलची नदी वाहत असल्याचे चित्र होते. अपघात झाल्यानंतर ऑइल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने नागरिकांनी मात्र ऑइल गोळा करण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मदतीसाठी अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहे. या संदर्भातली अधिक माहिती आणखी प्राप्त होऊ शकली नाही. परंतु अपघात इतका भीषण होता की, टँकर पूर्णतः मार्गावर पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र होते. त्याचबरोबर ऑइल संपूर्ण रस्त्यावर पसरल्याने बऱ्याच अंतरावरून नागरिकांना वाहतूक करावी लागत होती. नागरिकाने मात्र यातले ऑइल गोळा करण्यासाठी गर्दी केलेली दिसत होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले असून अग्निशमन दल दाखल झाले आहे. हा टँकर कोणत्या कंपनीचा होता? तो कुठून आला होता, कुठे जाणार होता? त्याचबरोबर या टँकर मधल्या चालक आणि वाहक यांची संपूर्ण माहिती आता घटनास्थळावरून पोलीस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्राथमि दृष्ट्या आणि वाहतूक कोंडी मोकळी करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. त्यानंतरच अधिक माहिती प्राप्त होणार आहे. परंतु आता मात्र रस्त्यावरती टँकरचा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.