Sushma Andhare News: गौरी भिडे हा फक्त चेहरा, त्याचा मास्टर माईंड शोधला पाहिजे-सुषमा अंधारे - criticized DCM Devendra Fadnavis
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या मालमत्ते संबंधित गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालय फेटाळत भिडे यांनाच २५ हजारांचा दंड ठोठावला. यावर गौरी भिडे हा फक्त चेहरा आहे. त्याचा मास्टर माईंड शोधला पाहिजे, हाच मास्टरमाईड मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील चालवतो, असे नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवला. अंधारे कल्याणमध्ये शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक केलेल्या विनायक डायरे यांच्या कुटूंबीयांची मंगळवारी सायंकाळी भेट घ्यायला आल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपसह मुख्यमंत्र्यावर टीका केली. दुसरीकडे साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना दिलासा मिळाला असताना, अनिल परब यांच्या रिसॉर्ट बरोबरच इतर ३३ लोकांना सी.आर. झेडच्या परवानग्या मिळाल्या होत्या, मग ३४ वे परबच कसे दिसले? नारायण राणे यांचा चिवला बीचचा बंगला पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असताना कारवाई होत नाही. अतिक्रमण विभाग कामात असेल, तर किरीट सोमय्या यांनी हातोडा घेऊन जावे. त्यांना पार्टटाईम पेमेंट मिळू शकेल अशी टीका अंधारे यांनी सोमैय्या यांच्यावर केली.