Video : मालेगावात पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणारा तरुण बेपत्ता - Malegaon Police Station
🎬 Watch Now: Feature Video
मालेगाव ( नाशिक ) : गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी (Stunt) करणारा तरुण बेपत्ता झाला आहे. मित्रासोबत स्टँडबाजी करतांना व्हिडीओ बनवत त्याने पुराच्या पाण्यात उडी घेतली होती. मात्र पाण्याचा फ्लो जास्त असल्याने त्यात तो वाहून गेला असल्याची धक्कादायक घटना गिरणा पुलावर (Girna bridge malegaon) घडली आहे. 23 वर्षीय हा तरुण मित्रांसोबत पुराचे पाणी बघण्यासाठी गिरणा पुलावर मालेगावला आला होता. त्यांने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी उडी घेतली व पुराच्या पाण्यात तरुण वाहून गेला असून नईम अमीन असे या तरुणाचे नाव असून त्याचा शोध घेतला जात आहे . बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालू होते.
पुलावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज - गिरणा आणि मोसम नदीवर सध्या मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी आले आहे. याठिकाणी अनेकजण पाणी बघण्यासाठी गर्दी करतात मात्र काही मुले हे सेल्फी घेण्यासाठी किंवा स्टंटबाजी करतात. यामुळे अशा तरुणांना थांबवण्यासाठी पोलिस बंदोबस्त (Malegaon Police Station) लावण्याची गरज आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST