Social Worker Seema Ostwal : महिलांनी आपले विचार बदलले, तरचं होईल समाज परिवर्तन - सिमा ओस्तवाल - International Womens Day
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-17936452-thumbnail-4x3-beed.jpg)
बीड : 'जग बदलतंय आपणही बदललं पाहिजे. जोपर्यंत आपले विचार बदलत नाहीत तोपर्यंत आपल्याला बदल झालेला पाहायला मिळत नाही, महिलाच महिलांच्या शत्रू आहेत, असचं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण अनेक गोष्टी घडत असताना कुटुंबामध्ये केंद्रबिंदू म्हणून महिला असतात आणि घरातील कोणतेही काम पुरुष मंडळी महिलांना विचारल्याशिवाय करत नाहीत. त्यामुळे महिलांनी आपले विचार बदलले पाहिजे, तरच आपल्यात परिवर्तन होईल. महिला म्हणून किंवा सासू म्हणून गर्भपातासारख्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहेत. जेव्हा एखादा प्रसंग घडतो एखाद्या मुलीची आत्महत्या होते किंवा ती गर्भवती असताना मरण पावते. तेव्हा कुठेतरी समाज प्रशासन जागं होत, त्याच्या अगोदर कोणीही जागरूक नागरिक म्हणून त्या गोष्टीकडे पाहत नाही. अल्पवयात लग्न केल्यामुळे अनेक मुलींचा बळी जात आहे, या सर्व गोष्टीसाठी महिलाच जबाबदार आहेत. तेव्हा महिलांनी आपले विचार आणि मानसिकता बदलली की, समाज व्यवस्थेत आणखी सकारात्मक परिवर्तन होईल.' अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यां सिमा ओस्तवाल यांनी महिला दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत' ला दिली.
हेही वाचा : VIDEO ..अन् सनी देओलला पाहून शेतकरी भारावला, बैलगाडी थांबवून हात मिळवले; पाहा व्हिडीओ