Shreyas Talpade Cleanliness Campaign : श्रेयस तळपदेच्या उपस्थिती वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान; पाहा व्हिडिओ - उदित नारायण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 1, 2023, 3:38 PM IST
मुंबई : Shreyas Talpade Cleanliness Campaign : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशवासीयांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर महानगरपालिका पश्चिम विभाग आणि एकता मंचानं 'स्वच्छता सेवा मोहिम' आयोजन केले होतं. या अभियानात अभिनेता श्रेयस तळपदे, नील नितीन मुकेश आणि गायक उदित नारायण यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी या दोघांनीही समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलून स्वच्छता केली. या ठिकाणी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील शेकडो नागरिक देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. यातून अभिनेते श्रेयस तळपदे यानं सामाजिक संदेश देऊन जनजागृती केली आहे. नागरिकांनी देखील स्वच्छतेचं भान ठेवावं, असं आवाहन या मोहिमेतून करण्यात आलं आहे.