Shravan 2023: श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात भक्तांची गर्दी, पाहा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट - pune news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/21-08-2023/640-480-19316794-thumbnail-16x9-bhimashanker.jpg)
पुणे : आज पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच गर्दी केली आहे. पहाटे साडेचारला महापूजा व आरती झाली. त्यानंतर मंदिर गाभारा भाविकांसाठी खुला करण्यात आला. मंदिराला तसेच शिवलिंगाला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आलंय. मंदिर परिसरामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठ सर्व भाविकांना नीट दर्शन घेता यावं, यासाठी देवस्थान ट्रस्टनं मोबाईल वापरण्यास बंदी आणली आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये. मंदिराचे पावित्र राखले जावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परीसरात फोटोग्राफी करू नये, असं आवाहन देखील भाविकांना करण्यात आलं. या परिसराचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीमाशंकर मंदिरास भेट द्यावी, अशी मागणी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंदेंनी यावेळी केली.