Shivsena Activists Agitation : संतप्त शिवसैनिकांनी भाजप आमदाराच्या कार्यलयावर टरबूज फेकून केले आंदोलन - Miraj Of Sangli District
🎬 Watch Now: Feature Video
सांगली - मिरजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी भाजपाच्या आमदारांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत टरबूज फेको आंदोलन केले आहे. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आमदार कार्यालय आणि फलकावर टरबूज फोडून निषेध नोंदवला आहे. यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमदरांसह गुजरात गाठल्याने काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडून भाजपसोबत युती करावी, असा प्रस्ताव शिंदे यांनी ठेवल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट तयार झाली. यामागे भाजप असल्याचे आरोप करत संतप्त शिवसैनिकांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर जमा होत आंदोलन केले. यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST