'गद्दार सावंत', असे लिहीत शिवसैनिकांकडून बंडखोर आमदार सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शिवसेना आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शिवनसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना कालच गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे. पुण्यात शिवसैनिकांनी राडा केला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील कार्यालयाची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली असून गद्दार सावंत, असे त्यांच्या कार्यालयावर लिहिले आहे. यावेळी सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST